बालकामगार ठेवल्याबद्दल तीन अभिनेत्रींवर गुन्हा दाखल

August 25, 2009 2:35 PM0 commentsViews: 64

25 ऑगस्टअभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांच्या घरी मंगळवारी पोलिसांनी छापा टाकून एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची सुटका केली. राज्याच्या कामगार खात्याच्या तक्रारीवरून ही धाड टाकण्यात आली. सुचित्रा कृष्णमूर्तीवर बालकामगार घरी कामाला ठेवल्याबद्दल केस दाखल करण्यात आली आहे. उमा खन्ना आणि लक्ष्मी या दूरदर्शनवच्या अभिनेत्रींवरही बालकामगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कामगार मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

close