सचिन तेंडुलकरची उद्धव ठाकरेंच्या फोटो प्रदर्शनाला भेट

January 11, 2015 5:03 PM0 commentsViews:

 

11 जानेवारी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीला भेट दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी सचिन आपली पत्नी अंजलीसोबत आला होता. दोघांनीही उद्धव यांच्या फोटोग्राफी कौशल्याला मनापासून दाद दिली.

दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी याआधी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. कालच उद्धव यांचे चुलत बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धवच्या फोटोंचं तोंडभरून कौतुक केले होतं.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close