झाडांची कत्तल करणार्‍यांना 7 लाखांचा दंड

August 26, 2009 9:09 AM0 commentsViews: 3

26 ऑगस्ट पुण्यातल्या मुळशी तालुक्यात कासारसाई इथे शेकडो झाडांची कत्तल करणार्‍या मारुती खानेकर याला 7 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हिंजवडी पासून जवळच असणार्‍या कासारसाई इथं एका धनाड्य शेतकर्‍यानं विनापरवाना अवैध उत्खनन केलं होत. पण त्याचबरोबर साडे तीनशे झाडांची कत्तल करून रस्त्याचं रुंदीकरणही केलं होत. एका बिल्डरसाठी हा सगळा अवैध काम सुरू होतं. यामध्ये मारुती खानेकर याने कासारसाईचे सरपंच आणि उपसरपंचही यांची मदत घेतली होती. आयबीएन लोकमतने हा मुद्दा उचलून धरला आणि मारूती खानेकरवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडलं. या प्रकरणात लवकरच अन्य दोषींवरही कारवाई करणार असल्याचं तहसील प्रशासनाकडून सागण्यात आलं आहे.

close