देशातल्या विद्यापीठांमध्ये श्रेणी पद्धत होणार बंधनकारक

January 12, 2015 12:14 PM0 commentsViews:

UGC  and IRANI

12 जानेवारी : देशभरातील 700 हून अधिक विद्यापीठांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युजीसीने 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यापीठांमध्ये ग्रेडिंग सिस्टम म्हणजेच श्रेणी पद्धत बंधनकारक केली आहे.

चॉईस बेस क्रेडीट सिस्टम आणि क्रेडीट फ्रेमवर्क फॉर स्किल डेव्हलपमेंट या पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देशही युजीसीने सर्व विद्यापीठांना दिले आहेत. यामुळे विद्यार्थी आपापल्या आवडीनुसार विषयांची निवड करू शकतात. या शिवाय सेमिस्टर पॅटर्न राबवण्याचेही विद्यापीठांना आदेश दिले आहेत.

भारतात सध्या 726 विद्यापीठ असून या विद्यापीठांमध्ये सुमारे 2 कोटी 80 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र यातील बहुतांश विद्यापीठांमध्ये गुणपद्धतीचा अवलंब केला जातो. देशातील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा निर्माण करुन विद्यापीठांमध्ये एकसूत्रता यावी यासाठी यूजीसीने पुढाकार घेतला आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय मनुष्यबह विकास मंत्री स्मृती इराणी आणि सर्व राज्यांचे शिक्ष्ज्ञणमंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये विद्यापीठांमध्ये श्रेणी पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close