कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत भाजपाची बाजी

January 12, 2015 1:26 PM0 commentsViews:

CANTONMENT1dhlasbhd

12 जानेवारी :  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मुसंडी मारणार्‍या भाजपनं महाराष्ट्रातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांमध्येही मुसंडी मारली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत 5 जागा मिळवत भाजपने आपले वर्चस्व राखले आहे तसंच देहूरोड कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपने 4 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत भाजपला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे तर या जागी 8 पैकी 5 जागांवर यश मिळवत काँग्रेसने आपला गड कायम राखला आहे.

नाशिकच्या देवळालीमध्येही भाजपची सरशी झाली आहे. एकूण 8 जागांपैकी 5 जागा भाजपनं मिळवल्या आहेत तर औरंगाबादेत 7 पैकी 3
जागांवर अपक्षांनी विजय मिळवला आहे तर शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळवला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मोदींची जादू दिसत असतानाच वाराणसी मतदारसंघात मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 7 जागांवर भाजपचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे अपक्षांकडून भाजपचा पराभव झाल्याने स्थानिक भाजपा नेत्यांची नाचक्की झाली आहे.

खडकी : एकूण जागा 8
काँग्रेस – 5
भाजप – 1
अपक्ष – 2

पुणे  : एकूण जागा 8
भाजप 5
काँग्रेस 2
अपक्ष 1

देहू रोड : एकूण जागा 7
भाजप 4
काँग्रेस 2
अपक्ष 1

औरंगाबाद : एकूण जागा 7
शिवसेना 2
भाजप 2
अपक्ष 3

देवळाली : एकूण जागा 8
भाजप – 5
शिवसेना – 1
आरपीआय – 1
अपक्ष – 1
(इकडे शिवसेना आणि भाजप होते आमनेसामने)

अहमदनगर – भिंगार कॅन्टोनमेंट बोर्ड निकाल

राष्ट्रवादी – 3,
शिवसेना – 3,
भाजपा – 1

कामटी  : एकूण जागा – 7
भाजप -3
काँग्रेस-1
अपक्ष -3
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close