पुस्तकाच्या प्रचारासाठी जसवंत सिंग पाकिस्तानात जाणार

August 26, 2009 9:09 AM0 commentsViews: 4

26 ऑगस्ट जीना-इंडिया,पार्टीशन, इंडिपेंडन्स पुस्तकाच्या प्रचारासाठी जसवंत सिंग पाकिस्तानला जाणार आहेत. शुक्रवारी ते इस्लामाबादमध्ये काही पुस्तकांच्या दुकानात जाऊन वाचकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते कराचीला रवाना होणार आहेत. या पुस्तकात जीनांची स्तुती करणार्‍या जसवंत सिंगांना भाजपनं डच्चू दिला असला तरी जसवंत सिंग आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या पुस्तकाची किंमत पाकिस्तानी चलनात जवळपास दोन हजार रुपये असली तरीही या पुस्तकाला पाकिस्तानात मोठी मागणी आहे. एखाद्या पुस्तकाची पाकिस्तानमध्ये एवढी प्रशंसा पहिल्यांदाच झाली असल्याचा दावा इस्लामाबादच्या प्रसिद्ध मिस्टर बुक या प्रकाशनाचे एमडी मोहम्मद युसुफ यांनी केला आहे.दरम्यान जसवंत सिंग यांनी समाजवादी पक्षात येण्याचं आवाहन अमरसिंग यांनी केलं आहे. तसंच जसवंत सिंग यांच्याशी फोनवरुन बोलणं झाल्याचंही अमरसिंग यांनी सांगितलं.

close