दिल्ली विधानसभेसाठी 7 फेब्रुवारीला मतदान

January 12, 2015 7:45 PM0 commentsViews:

12 जानेवारी :  गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज सोमवारी घोषणा करण्यात आली. विधानसभेच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यात 7 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 10 फेब्रुवारीला मतमोजणी होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. संपत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

14 जानेवारीपासून उमेदवार अर्ज भरू शकतील. तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी आहे. 22 जानेवारीला अर्जांची छाननी होईल. सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्जातले सर्व रकाने भरणं बंधनकारक असणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे 24 जानेवारी. सर्व ईव्हीएम मशिन्सवर ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध असणार आहे. या विधानसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात सत्तास्थापनेसाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

दिल्लीतील एकूण 1 कोटी 30 लाख मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी आजपासूनच आचारसंहिता लागू झाल्याचेही संपत यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्ली विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या दिल्लीत फेरनिवडणुकीबाबत शिक्कामोर्तब झाले होते. 4 नोव्हेंबरला दिल्लीतील विधानसभा बरखास्त करण्यात आली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close