निफाड साखरकारखान्याच्या संचालकांना न्यायालयीन कोठडी

August 26, 2009 9:13 AM0 commentsViews: 28

26 ऑगस्ट निफाड सहकारी साखर कारखान्यातल्या घोटाळा प्रकरणी सर्व 24 संचालकांना निफाड कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. हा घोटाळा तब्बल 10 कोटी 66 लाखांचा आहे. तत्कालीन संचालकांमध्ये माणिकराव बोरस्ते, आर.डी. क्षीरसागर, प्रतापराव मोगल, साहेबराव पानगव्हाणे अश्या राजकीय नेत्यांचा समावेश आहे. 2004 ते 2005 या काळात आशापुरा ट्रेडींग या व्यापारी कंपनीला कारखान्याने साखर विकली होती. या साखरेसाठी कंपनीनं दिलेले 10 कोटी 66 लाखांचे चेक वटलेच नाही. पण कारखान्याने मात्र ही रक्कम वसूल झाल्याचं हिशोबात दाखवलं. या प्रकरणी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संजय बारकुंड यांचीही खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

close