क्रिकेट मैदानावर सेलिब्रिटींची गर्दी

January 12, 2015 7:23 PM0 commentsViews:

‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’चा आज ‘मुंबई हिरोज’ विरुद्ध ‘वीर मराठी’ असा सामना तुफान रंगला. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ‘मुंबई हिरोज’चा कॅप्टन बॉबी देओल आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित होता तर रितेश देशमुखच्या ‘वीर मराठी’ला सपोर्ट करण्यासाठी जिनेलियाही उपस्थित होती. टेलिव्हिजन कपल रश्मी देसाई आणि नंदिश सांधू यांनीही हा खेळ पाहण्यासाठी हजेरी लावली. याव्यतिरिक्त पॉप सिंगर सोफी चौधरी, अनिल कपूर, सोनम कपूर, अनुपम खेर, मलायका अरोरा खान, अरबाज खान हेही उपस्थित होते. तसेच सोनम आपल्या आगामी ‘डॉली की डोली’ तर बिपाशा बासू आणि करण ग्रोवर ‘अलोन’ या आपल्या आगामी चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी आले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close