H1N1चा पुण्यात 25 वा, तर मुंबईत 4था बळी

August 26, 2009 9:16 AM0 commentsViews: 1

26 ऑगस्टपुण्यात H1N1चा 25 वा बळी गेला आहे. शबाना शेख असं मृत्यू पावलेल्या महिलेचं नाव आहे. ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्यांचा मृत्यू झालाय. 22 तारखेला त्यांना ससूनमध्ये दाखल करण्यात आलं होतं. H1N1 या व्हायरसनं मुंबईतही चौथा बळी घेलाय चांदिवली इथ राहणार्‍या संदीप गायकवाड या 28 वर्षांच्या युवकाचा पवईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून संदीपवर उपचार सुरू होते. त्याला व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यातून तो वाचू शकला नाही. दरम्यानं संदीपचा मृत्यू हॉस्पिटलच्या हलगर्जीमुळचं झाल्याचा आरोप करत, संदीपचे वडील छगन गायकवाड यांनी हिरानंदानी हॉस्पिटल विरोधात पवई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

close