बिग बी, मुकेश अंबानींनी दिली प्रदर्शनाला भेट

January 12, 2015 6:08 PM0 commentsViews:

12 जानेवारी :  मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीत उद्धव ठाकरेंनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशीही अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला उपस्थिती लावली. उद्योगपती मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन यांनीही आज प्रदर्शनाला हजेरी लावली. काल नसीरुद्दीन शाह, स्मिता ठाकरे, सचिन तेंडुलकर आणि प्रफुल्ल पटेल यांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. या छायाचित्रांच्या विक्रीतून मिळणारा सर्व निधी राज्यातल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिला जाणार आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close