मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलेच पाहिजे- तावडे

January 13, 2015 8:59 AM0 commentsViews:

Vinod tawde

13 जानेवारी :  मुंबईत जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलेच पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.

मराठी विश्‍वकोश खंड 20च्या पूर्वार्धाचे प्रकाशन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी तावडे बोलत होते.

मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलेच पाहिजे. दुकानाच्या पाट्या फक्त मराठीत असून चालत नाहीत तर त्या दुकानातील माणसालाही मराठी आलेच पाहिजे आणि त्यासाठी मराठी लोकांनीच मराठीचा आग्रह धरला पाहिजे, असंही तावडे म्हणालेत.
राज्यात आज शाळा बंद आंदोलन.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close