मुंबईत लॅमिंग्टन रोडवर पाच मजली इमारत कोसळली: दोन ठार

August 26, 2009 9:21 AM0 commentsViews:

26 ऑगस्टमुंबईत लॅमिंग्टन रोडवर कोसळलेल्या "युसुफ मंजिल "इमारतीच्या ढिगार्‍याखाली सापडून झुबेदा खंबाटी या 83 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही पाच मजली इमारत कोसळली. ढिगार्‍याखालून 3 जणांना बाहेर काढण्यात आलं. घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. इमारत कोसळल्यामुळे काही टॅक्सींचं पण नुकसान झालं आहे. दरम्यान इमारत कोसळल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये इमारतचा मालक आणि एका दुकानदाराचा समावेश आहे. या दुकानदाराच्या दुकानाचं रिनीव्हेशनचं काम सुरु होतं. हे दोघेही सध्या फरार आहेत.

close