मनसेला खिंडार, तीन माजी आमदार भाजपमध्ये

January 13, 2015 3:41 PM0 commentsViews:

darekar gite

13 जानेवारी :  मनसेचे माजी आमदार वसंत गीते, प्रवीण दरेकर आणि रमेश पाटील यांनी आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.

विधानसभा निवडणुकीत मनसेच्या निराशाजनक कामगिरीनंतर प्रवीण दरेकर आणि वसंत गीते या दोघांनीही मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. दरेकर आणि गीते हे दोघेही  नाराज असल्याची चर्चा होती. या नाराजीमुळेच गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होते. अखेरीस काल सोमवारी प्रवीण दरेकर आणि वसंत गीते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं अधिकृतरित्या जाहीर केले.

दरम्यान, पक्षात नवीन आलेल्या या नेत्यांनी कोणत्याही पदाची मागणी केलेली नसल्याचं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचं बरोबर राज्यात पक्षाचे एक कोटी सदस्य करण्याचा भाजपने संकल्प केला असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close