ढसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘सारं काही समष्टीसाठी’ कार्यक्रमाचं आयोजन

January 13, 2015 5:40 PM0 commentsViews:

namdev_dhasal_313 जानेवारी : ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आता या शहराशहराला आग लावत चला’ मराठी काव्य विश्वाला हादरा देणारे बंडखोर कवी आणि दलित पँथर या झुंजार संघटनेच्या माध्यमातून दलित अत्याचार विरोधात युद्ध पुकारणारे नेते नामदेव ढसाळ…अशा या महाकवीच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ‘सारं काही समष्टीसाठी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. ‘नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती’च्या वतीने येत्या 15 जानेवारी रोजी रवींद्र नाट्य मंदिर इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.

‘सारं काही समष्टीसाठी’ या कार्यक्रमात नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन, त्यांच्या कवितांचे नाटय़रूप, त्यांनी लिहिलेल्या गाण्यांचे सादरीकरण अशी वेगवेगळी सत्रे होणार आहेत. तसंच ढसाळ यांच्या जीवनावर व कवितांवर आधारित चित्रप्रदर्शन, चित्रकविता प्रदर्शन, शाहिरी, कविता वाचन, चर्चासत्र, चित्रपट लघुपट स्क्रीनिंग अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी तमाम ढसाळप्रेमी जनतेने या कार्यक्रमात सहभागी व्हावं, असं आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close