दुष्काळी निधीचं वाटप 25 जानेवारीपर्यंत, पण गाव हे निकष लागू !

January 13, 2015 8:22 PM0 commentsViews:

cm on _drought23413 जानेवारी : अवकाळी पाऊस, गारपिटी आणि पाणी टंचाईने होळपळणार्‍या शेतकर्‍यांना राज्य सरकारने दिलासा दिलाय. येत्या 25 जानेवारीपर्यंत निधी वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. मात्र हा निधी दुष्काळग्रस्त गाव पाहून वाटप करण्यात येणार आहे.

अस्मानी संकटाने खचलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. पण महिना उलटला तरी निधी शेतकर्‍यांपर्यंत पोहचला नाही. अखेरीस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या दुष्काळी निधीचं वाटप 26 जानेवारीपर्यंत करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. रतसंच गाव हा निकष लावून वाटप करा, असे आदेशही जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. साधारणत: 2000 कोटीचं वाटप होणार आहे. गेल्या वर्षातल्या खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीशी संबंधित शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी 7 जानेवारी 2015ला दोन हजार कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय.

विभागवार कशी मदत मिळणार ?

– नाशिक : 386.62 कोटी रु.
– पुणे : 7.50 कोटी रु.
– औरंगाबाद : 845.55 कोटी रु.
– अमरावती : 500.93 कोटी रु.
– नागपूर : 259.40 कोटी रु.
– जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टरी 4 हजार 500 रुपये
– बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी 9 हजार रुपये
– फळपिकाखालच्या शेतीसाठी प्रति हेक्टरी 12 हजार रुपये मदत

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close