शिवाजी महाराज स्मारक प्रतिकृतीचं मंत्रालयात अनावरण

August 26, 2009 10:24 AM0 commentsViews: 80

26 ऑगस्टअरबी समुद्रातील शिवाजी महाराज स्मारक प्रतिकृतीचं मंत्रालयात उद्घाटन करण्यात आलं आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. मुंबईपासून साधारणत:दीड किलोमीटर अंतरावर समुद्रात शिवाजी महाराजांचा भव्य असा 309 फूट उंचीचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्मारकामध्ये अद्ययावत वस्तुसंग्रहालय, उपहारगृह, ऍम्फि थिएटर, मोठा बगीचा, 2 हेलिपॅड, एक्झिबिशन सेंटर असा सर्व सोईसुविधा असणार आहेत. ऐन आचारसंहिता लागण्याच्या तोंडावर शिवस्मारकाच्या प्रतिकृतीचं अनावरण सत्ताधारी आघाडी सरकारनं केलं आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवस्मारकाच्या अंतिम आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार थायलंडचं बेसले डिझाईन स्टुडिओ आणि मुंबईच्या टीम वन आर्किटेक्ट या दोन कंपन्यांच्या संकल्पनेतून हे शिवस्मारक उभारलं जाणार आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी सुरूवातीला राज्यसरकारने 350 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे शिवस्मारकाच्या माध्यमातून निवडणुकांच्या प्रयत्नात आघाडी घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षानं केल्याचं स्पष्ट होतंय.

close