वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

January 14, 2015 9:26 AM0 commentsViews:

Vasai Leaporad
14  जानेवारी :  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मंगळवारी रात्री भरधाव वेगातल्या एका अज्ञात वाहनाने बिबट्याला उडवले. या अपघातामध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथे बिबट्या रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातल्या वाहनाने बिबट्याला उडवले. यात बिबट्याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. हा नर बिबट्या 1 वर्षांचा होता, अशी माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. रात्री उशिरा शवविच्छेदनासाठी बिबट्याला बोरिवलीतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close