युपीएसीच्या मुख्य परीक्षेचे अर्ज महाराष्ट्रात पोहोचलेच नाहीत

August 26, 2009 12:06 PM0 commentsViews: 1

26 ऑगस्ट यूपीएस्सीची प्रिलीम परीक्षा पास केलेल्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची 28 ऑगस्ट तारीख आहे.मात्र यूपीएस्सी कडून महाराष्ट्रात अर्ज पोहोचलेच नाही अश्या अनेकांच्या तक्रारी आहेत. अर्ज भरण्याची मुदत दोनच दिवस राहिल्यानं विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. पण अजून अर्ज न मिळाल्याने काही विद्यार्थ्यांनी थेट दिल्ली गाठली. तर काहीजण दिल्लीहून आपल्या मित्रांकडून विमानाने अर्ज मागवताहेत. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना अर्ज पोहचवण्यात अडचणी असतील त्यांनी चाणक्य मंडळाच्या कार्यालयात अर्ज आणून द्यावेत, त्यांचे अर्ज दिल्लीला वेळेवर पोहचवण्याची व्यवस्था केली जाईल. असं चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी IBN लोकमतशी बोलताना सांगितलं आहे.

close