दिविजाच्या शाळेत ‘डॅडी’ देवेंद्र फडणवीस

January 14, 2015 12:45 PM1 commentViews:

14  जानेवारी : नेहमीच्या धावपळीच्या दिनक्रमापेक्षा आज मुख्यमंत्र्यांचा दिवस थोडा वेगळ्या पद्धतीनं सुरू झाला. रोज राजकीय नेते आणि अधिकार्‍यांना भेटणारे फडणवीस आज डॅडींच्या भूमिकेत दिसले. आज सकाळी 8 वाजता कमला नेहरू पार्कमध्ये दिविजाच्या शाळेच्या वतीने ‘डॅडी डे’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री दिविजाच्या शाळेत उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात डॅडींसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते, त्यात मुख्यमंत्र्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • SVKNet

    Lai bhari :)

close