राधाकृष्ण विखेपाटील यांनी लावली नातेवाईकांची वर्णी

August 26, 2009 1:40 PM0 commentsViews: 6

26 ऑगस्टमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांतर्गत सरकारी वकीलांच्या नियुक्त्यांमध्ये राज्याचे विधी आणि न्यायमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी आपल्या नातेवाईकांची वर्णी लावल्याचा आरोप ओबीसी संघर्ष समितीने केला आहे. शिवाय 32 सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांमध्ये मंत्र्यांनी स्वत:च्या नातेवाईकांसाठी आरक्षणाच्या जागांवर कुर्‍हाड घातल्याचाही आरोप त्यांनी केलाा आहे.16 जुलै रोजी उपमुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये 52 टक्के आरक्षणाचं तत्त्व लागू करेपर्यंत आणि शासनाचा योग्य तो निर्णय होईपर्यंत नियुक्त्या स्थगित ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्याचंही पालन करण्यात आलं नाही असंही या समितीने सांगितलं आहे.

close