नाशिकमध्ये लष्कराच्या जवानांनी पोलीस स्टेशन फोडले

January 14, 2015 5:58 PM0 commentsViews:

nashik_army414 जानेवारी : लष्कर आपल्या शिस्तीसाठी प्रसिद्ध आहे, मात्र लष्करी जवानांनी शिस्त मोडून चक्क पोलीस स्टेशनवरच हल्ला केल्याची गंभीर घटना नाशिकमध्ये घडली आहे. लष्कराच्या जवानांनी तीन पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण केली असून पोलीस स्टेशनच्या सामानांची तोडफोड केलीये.

घडलेली हकीकत अशी की, नाशिकमधल्या उपनगर पोलीस स्टेशनमध्ये काही लष्करी अधिकार्‍यांविरूध्द तक्रार नोंदवण्यात आली होती. त्याचा राग मनात धरून 80 जवान लष्करी वाहनात आले आणि त्यांनी पोलीस स्टेशनवरच हल्ला चढवला, सामानांची प्रचंड नासधूस केली. आवरातल्या पोलिसांच्या गाड्याही फोडल्या. या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. तणाव निवळण्यासाठी पोलीस आणि लष्करी अधिकार्‍यांमध्ये बैठक झाली.पण त्या बैठकीत काय झालं याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close