पतंग उडवा, पण मुक्याजिवांचा विचारही करा !

January 14, 2015 8:40 PM0 commentsViews:

kite_mumbai14 जानेवारी : मकर संक्रांत…तिळगुळ, हलव्याच्या दागिने, आणि पतंगबाजी आलीच…पतंगबाजी तर बच्चेकंपनीची ठरलेलीच पण याचा मोह मोठ्यांनाही आवरत नाही. उद्याच्या दिवशी आकाश रंगिबेरंगी पतंगांनी भरून जाणार…पण तुमच्या पतंगबाजीचा आनंद हा मुक्या जिवांवरही बेततो हेही लक्षात असू द्या.!, पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा काचेचा, नायलॉनचा मांज्यामुळे दरवर्षी पक्षी जखमी होतात नुसते जखमीच नाहीतर काहींचा बळीही जातो.

मकर संक्रांतीच्या सणाला तिळगुळा प्रमाणे पतंग उडविण्याला विशेष महत्व आहे. या सणाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लहानांपासून ते थोरांपर्यंत पतंग उडवण्याची मज्जा लुटत असतात. या दिवशी अनेकांचा खेळ होत असतो. मात्र, या सणाच्या दिवशी पक्षांना याचा मोठा फटका बसत आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंग उडवली जात असतात. त्यामुळे पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या काचेच्या मांज्यामुळे अनेक पक्षांच्या पंखाना दुखापत होत असतात. त्यातच काही पक्षांचा प्राण देखील जात असतात. असे अनेक पक्षी ठाण्यातील ब्रम्हांड येथील असलेल्या प्राणी व पक्षांच्या दवाखान्यात उपचारासाठी मकर संक्रांत नंतर येत असल्याची माहिती येथील डॉ. सुहास राणे यांनी दिली. तसंच येथे दुखापत झालेल्या पक्षांना घेवून येवून त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. जखम तीव्र असल्यास ड्रेसिंग करण्यात येते. पक्षांना विटामिन ड्रॉप, बेटनिसोल ड्रॉप देण्यात येवून त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ जागी सोडण्यात येते. तसंच पतंग उडविताना वापरण्यात येणार्‍या काचेच्या मांज्यामुळे काही वेळा माणसे देखील दगावत असतात तर पक्षांचा जीव तर खूप नाजूक असतो त्यामुळे काही पक्षांना देखील प्राण जात असतो. दरम्यान मागील वर्षी संक्रांतसणाच्या काळात घुबड, पोपट, कावळे व ससाणे असे 40 ते 45 पक्षी जखमी झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याची माहिती देखील डॉ. राणे यांनी यावेळी दिली.

या घटनांचे गांभीर्य लक्षात घेवून ठाण्यातील कोपरी भागातील पतंग विक्रेते मधु ठोसर यांनी रांगोळीने तयार केलेल्या नैसर्गिक पद्धतीचे मांजे विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. आजकाळ मोठ्या प्रमाणात बाजारात चायना मेड पद्धतीचे मांजे देखील बाजारात विक्रीसाठी आले आहेत. या मंजांचा वापर शक्यतो टाळावा व नैसर्गिक पद्धतीच्या मांज्याला पसंती द्यावी असे आवाहन पतंग व मांजा विक्रेते यांनी केली आहे. डॉक्टरानी देखील पतंग उडविताना काचेच्या मंज्याचा वापर टाळण्याचा सल्ला पतंग प्रेमीना दिला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close