बालकामगारप्रकरणी सुचित्रा कृष्णमूर्तीला क्लीन चिट

August 26, 2009 2:02 PM0 commentsViews: 86

26 ऑगस्टबालकामगार विरोधी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी बुधवारी कामगार मंत्री नवाब मलिक यांची भेट घेतली आणि यानंतर कामगार विभागाला सुचित्राचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा साक्षात्कार झाला.त्यानंतर सुचित्रा कृष्णमीतीर्ना क्लिन चीट देण्यात आल्याचं कामगार मंत्री नबाब मलिक यांनी घुमजाव करत जाहीर केलं. राज्याच्या कामगार खात्याच्या तक्रारीवरून अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीच्या घरी मंगळवारी पोलिसांनी छापा टाकला होता. छाप्यादरम्यान 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची या अभिनेत्रीच्या घरून सुटका करण्यात आली होती . उमा खन्ना आणि लक्ष्मी या अभिनेत्रींवरही बालकामगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कामगार मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती.

close