रेशन दुकानात डाळीच नाहीत

August 27, 2009 5:53 AM0 commentsViews: 58

27 ऑगस्ट स्वस्तातल्या सरकारी डाळीचा अजून शासकिय गोदामातच पत्ता नसल्यानं रेशन दुकानदारांना मात्र ग्राहकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. मोठा गाजावाजा करत 55 रूपयेे दरानं रेशन दुकानातून तूर डाळ देण्याचं सरकारचं आश्वासन हवेतंच विरलं. 15 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी तूरडाळीचं वाटप करत 20 तारखेपासून राज्यात सर्वत्र रेशन दुकानांमधे तूरडाळ मिळेल अशी घोषणा केली होती. पण गणपती आले, त्यानंतर गौरींच्या आगमनाची वेळ आली. मात्र अजूनही या सरकारी डाळीचा पत्ता नाही. ग्राहक मात्र अपेक्षेनं हेलपाटे मारत आहेत. पुणे जिल्ह्याला मंजूर कोट्यापैकी नाममात्र तूरडाळीचा पुरवठा झाल्याने अधिकार्‍यांनी वादावादी नको म्हणून जेवढी तूरडाळ आली ती गोदामातच ठेवायचा निर्णय घेतला आहे. सरकारी गलथानपणाच्या कचाट्यात सापडले रेशन दुकानदार. साखर नाही, गहू-तांदळाचा अपुरा पुरवठा त्यात तूरडाळ नाही. यामुळे गप्प बसून ऐकून घेण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरलेला नाही.

close