UPSC विद्यार्थ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री

August 27, 2009 5:58 AM0 commentsViews: 1

27 ऑगस्ट UPSC ची मुख्य परीक्षा देणार्‍या राज्यातल्या कित्येक विद्यार्थ्यांना अर्जच मिळाले नाहीत. या मुद्द्‌याला ibn lokmat ने बुधावारी वाचा फोडल्यानंतर आता स्वत: मुख्यमंत्री अशोक चव्हाण या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले आहेत. अर्ज भरण्याची शुक्रवार28 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. मात्र विद्यार्थ्यांचा प्रश्न अजून सुटलेला नाही. या प्रकाराची चौकशी करु आणि या विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे शक्य ती मदत करु असं, आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.ज्या विद्यार्थ्यांना उशिरा फॉर्म्स मिळाले आहेत त्यांच्यासाठी फॉर्म्स सोपविण्याची तारीख वाढवून मिळेल का या विषयी UPSC ने अजुन तरी काहीही म्हटलेलं नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळ तरी या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का हेच पहाव लागेल.

close