किरण बेदी भाजपमध्ये, विधानसभा निवडणूकही लढवणार !

January 15, 2015 6:03 PM0 commentsViews:

bedi in bjp15 जानेवारी : आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या आणि देशाच्या पहिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी आज (गुरुवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशासोबतच बेदी यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. किरण बेदी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात केजरीवाल यांच्यासोबत एकत्र लढा देणार्‍या किरण बेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करून ‘आप’ला एकच धक्का दिलाय. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात बेदी यांनी मुख्य सदस्य म्हणून भूमिका पार पाडली होती. त्यानंतर त्यांनी केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीसोबतही काही काळ काम केलं. मात्र, पक्षातील दुफळीमुळे बेदी यांनी आपला रामराम ठोकला होता. अखेर आज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरण बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. दिल्लीमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री आणि वरीष्ठ नेते अरूण जेटली, भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांच्या उपस्थितीत बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी किरण बेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मोदी यांच्या नेतृत्वामुळे आपण प्रभावीत झाली असून त्यांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास आहे. मी स्वत:ला देशाला समर्पित केलंय. गेल्या 40 वर्षात देशाची सेवा केली. त्याचा अनुभव माझ्यासोबत असून तो दिल्लीवासियांच्या कामी यावा यासाठी प्रयत्न करणार आहे अशी भावना बेदी यांनी व्यक्त केली. तसंच किरण बेदी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत, मात्र मुख्यमंत्रिपदाचा निर्णय संसदीय पक्षच घेईल असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close