दीड महिन्यापासून सुरू असलेला प्राध्यापकांचा संप मिटला

August 27, 2009 5:58 AM0 commentsViews: 1

27 ऑगस्टदीड महिन्यापासून सुरू असलेला राज्यभरातल्या प्राध्यापकांचा संप मिटला. संप मागे घेतल्याची एम फुक्टोने अधिकृत घोषणा केली आहे . गुरुवारपासून प्राध्यापक कामावर रूजू होणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपेंच्या सोबत बुधवारी एम-फुक्टो संघटनेच्या सदस्यांची बैठक झाली. एमफुक्टोने अखेर बिगरनेटसेट प्राध्यापकांना सेवेत कायम करण्याच्या मागणीवरून माघार घेतली. ही मागणी उच्च शिक्षणमंत्र्यांनी मान्य केली नाही. परंतु, केंद्राप्रमाणे सहाव्या वेतन आयोगाच्या सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राध्यापकांना युजीसीनुसार वेतनश्रेणी,भत्ते आणि सवलती देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तसा सुधारित जीआरही काढण्यात येणार आहे. प्राध्यापकांच्या निवृत्तीचं वय 65 करण्याची जी मागणी केली होती, ती मागणीही मान्य झालेली नाही. 1999 आधीच्या बिगर नेट सेट प्राध्यापकांना सेवेत कायम करण्यासाठी राज्यसरकार 4 सदस्यीय समिती नेमणार आहे. या समितीत दोन सदस्य हे एम फुक्टोचे असतील तर दोन सदस्य राज्य सरकारचे सदस्य असतील . 14 जुलैला पुकारलेला हा संप तब्बल 44 दिवस चालला. महाराष्ट्रातल्या प्राध्यापकांनी केलेला हा ऐतिहासिक असा संप होता.

close