मदतीचा दुष्काळ, केंद्राकडून महाराष्ट्राला निधी नाहीच !

January 15, 2015 8:27 PM0 commentsViews:

maharshtra_drought_help15 जानेवारी : गारपीट आणि अवकाळी पावसाने हवालदील झालेला शेतकरी केंद्राकडे मदतीच्या आस लावून आहे पण महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा एकदा उपेक्षा आली आहे. एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती कृती दलाने मदत जाहीर केली असून आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि अरुणाचल प्रदेशच्या पूरग्रस्तांना निधी देण्यात आलाय. पण महाराष्ट्राकडे सपशेल पाठ फिरवली आहे.

गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात अस्मानी संकटाने कहर केला. गारपीट, अवकाळी पाऊस आणि त्यातच पाणी टंचाई, दुष्काळ…त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हैराण झालाय. वर्षाच्या शेवटलाही गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडच पाणी पळवलंय.राज्य सरकारने 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. आणि केंद्राकडे 6 हजार कोटींची मागणी केलीये. मात्र, केंद्राने राज्य सरकारच्या मागणीकडे सपशेल पाठ फिरवल्याचं दिसून येतंय. राष्ट्रीय आपत्ती कृती दलाने (एनडीआरएफ) आज आंध्र प्रदेशातल्या हुडहूड चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना मदत जाहीर केली. आंध्रबरोबरच अरुणाचल प्रदेशच्या पूरग्रस्तांना, कर्नाटकातल्या दुष्काळग्रस्तांना आणि पूरग्रस्तांनाही एनडीआरएफनं आज मदत जाहीर केलीये. पण महाराष्ट्राच्या पॅकेजचा विचारही केला गेला नाहीये. महाराष्ट्राच्या प्रस्तावाची एनडीआरएफच्या बैठकीत चर्चाही झाली नाही. महाराष्ट्रानं एनडीआरएफकडे 6 हजार कोटींचा प्रस्ताव दिलाय. गारपीट, दुष्काळ आणि अवकाळी पावसाच्या मदतीसाठी महाराष्ट्रानं ही मागणी केली होती. मात्र, महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा मदतीचा दुष्काळ आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close