नॅशनल ऍवॉर्डसाठी शाहरूख खान आणि आमीर खान आमने सामने

August 27, 2009 7:33 AM0 commentsViews: 3

27 ऑगस्ट2007मध्ये रिलीज झालेल्या सिनेमांसाठी नॅशनल ऍवॉर्ड लवकरच घोषित केले जातील. आणि यावेळी शाहरूख खान आणि आमीर खान आमने सामने असणार आहेत. बेस्ट ऍक्टर कॅटेगिरीसाठी शाहरूख खान आणि आमीर खान नॉमिनेट झाले आहेत. चक दे इंडियासाठी किंग खान आणि तारे जमीं परसाठी आमीरमध्ये ही स्पर्धा आहे.अजून या दोन्ही खान्सना बेस्ट ऍक्टरसाठी ऍवॉर्ड मिळालं नव्हतं.तारे जमीं पर आणि ओम शांती ओम सिनेमांमध्येही सर्वोत्कृष्ठ सिनेमासाठी स्पर्धा आहे. पुढच्या महिन्यात राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते हे ऍवॉर्ड दिले जातील.2005मधल्या ऍवॉर्डसविरोधात डॉक्युमेंट्री मेकर आनंद पटवर्धन यांनी कोर्टात धाव घेतली होती, म्हणून या ऍवॉर्डसना उशीर झाला आहे.

close