पतंगबाजीने घेतला दोघांचा बळी

January 15, 2015 10:28 PM0 commentsViews:

nagpur_patanbaji15 जानेवारी : देशभरात मकर संक्रांत उत्साहात साजरी करण्यात आली खरी पण या उत्सवाला गालबोट लागलंय. पतंगबाजीमुळे झालेल्या अपघातात नागपुरात दोन जणांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहे.

नागपुरात दरवर्षीप्रमाणे पतंगबाजीला उधाण आलंय पण या पतंगबाजीच्या नादात राजेश पटेल (18 वर्षे) तर देवाश अहिरे (7 वर्षे)या दोघांचा बळी गेलाय. पतंग पकडण्यासाठी गेले असतांना दोघांना शॉक लागून मृत्यू झालाय. नंदनवन आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात झाले आहेत. नायलॉन मांजावर बंदी असतांनाही सर्रास या मांजाचा वापर झाल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. नायलॉन मांजा रस्त्यात आल्याने तीन जणांचे गळे कापले गेले आहेत. शहरात आणखीही काही अपघात पतंगामुळे झाले असून त्यांची नोंद झाली नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close