साखरेच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सोनियांचं पवारांना पत्र

August 27, 2009 9:13 AM0 commentsViews: 3

27 ऑगस्टसाखरेच्या वाढत्या किमतींबाबत काळजी व्यक्त करणारं पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शरद पवारांना लिहिलं आहे.आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार या पत्रामध्ये, सणासुदीचे दिवस सुरू झाले असताना या काळात साखरेचा पुरवठा व्यवस्थित व्हावा याची काळजी घेण्यात यावी. तसंच साखरेच्या वाढत्या किमती लवकरात लवकर आटोक्यात आणाव्यात असंही आवाहन सोनिया गांधी यांनी शरद पवारांना केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी बुधवारी शरद पवार साखरेबाबत देशाची दिशाभूल करत आहेत, अशी टीका केली होती. तसंच प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते कन्हैयालाल गिडवाणी यांनीही पवारांना साखरेच्या मुद्द्यावरून लक्ष्य बनवलं होतं. आता सोनिया गांधींच्या पत्रामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातलं अंतर थोडं वाढलंय असंही जाणकारांचं म्हणणं आहे.

close