वीज बिलदरवाढ आंदोलनाबाबत शुक्रवारी निर्णय घेऊ – राज ठाकरे

August 27, 2009 9:23 AM0 commentsViews: 4

27 ऑगस्ट वीजबिलदरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्याची डेडलाईन मनसेनं वाढवली आहे. गुरूवारी सकाळपासून या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. मात्र गुरूवारी संध्याकाळपर्यंत सरकारच्या निर्णयाची वाट पाहू. नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करू असा इशाराही राज यांनी दिला आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारी जाहीर करू असं मंुबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केलं. ग्रामीण आणि शहरी वीजबिलात असलेल्या तफावतीकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधलं. गुरूवारीच या मुद्द्यावर त्यांनी वीजनियामक आयोगाचे अध्यक्ष व्ही. पी. राजा यांची भेट घेतली होती. होडीर्गवरच्या अनावश्यक वीज वापरावर निर्बंध आणा, लोडशेडिंग सुरू असताना मॉल्स, कन्स्ट्रक्शन साईट यांना सूट देवू नका अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या. दरम्यान राज ठाकरेंच्या इशार्‍यानंतर सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. ऊर्जामंत्री सुनिल तटकरे यांनी वीजदराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

close