पिंपरी आत्महत्या प्रकरण : पोलिसांचा पीडित कुटुंबीयांमागेच चौकशीचा ससेमिरा

January 16, 2015 3:00 PM0 commentsViews:

Rape victim

16 जानेवारी : रोडरोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या मुलीच्या आईवडिलांच्या मागेच पोलिसांनी चौकशीचा ससेमिरा लावला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारी मुलगी 13 दिवसांपासून कोमामध्ये असून मुलीच्या प्रकृतीमुळे चिंतेत असलेल्या आईवडिलांच्या मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

पिंपरीतल्या भोसरी परिसरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीची परिसरातील काही रोडरोमिओ छेड काढत होते. या रोडरोमिओंविरोधात पोलिसांकडे तक्रारही केली होती पण पोलिसांनी केलेले दुर्लक्ष आणि रोडरोमिओंचा त्रास या जाचाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलीने आत्महत्येचा प्रयत्न करताच भोसरी पोलिसांना खडबडून जाग आली असून प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून पोलिसांनी बाबू नायक, सचिन चव्हाण आणि अकीब शेख या तीन तरुणांना अटक केली आहे. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत रोडरोमिओंना अटक केली असती तर त्या मुलीवर गळफास घेण्याची वेळ आली नसती असे तिच्या आईवडिलांनी सांगितले. पोलीस कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणाची चौकशी करू असे सांगत भोसरी एमआयडीसी पोलिसांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close