पुण्यात पकडली 10 लाखांची जकात चोरी

August 27, 2009 9:31 AM0 commentsViews: 3

27 ऑगस्ट मुंबई -पुणे रोडवरच्या फुगेवाडी जकात नाक्यावरून जकात न भरता तांबे आणि अल्युमिनिअम घेऊन जाणारे 4 ट्रक पालिकेच्या भरारी पथकानं पकडले आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही जकातचोरी उघडकीला आणून दिली. हडपसरमधल्या एमआयडीसीतल्या इनकॅब कंपनीत हे ट्रक आले होते. अधिकृत बिलांनुसार या मालाची किंमत 80 लाखांपर्यंत आहे. त्यानुसार या ट्रक्सनी सुमारे 10 लाखांची जकात चोरी केल्याचं उघड झालं आहे. मनसेचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे यांनी ही चोरी महानगरपालिकेच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आणून दिली. ट्रक्सकडून नियमांमुसार जकात आकारण्यात येईल असं अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. गेले काही दिवसांपासून पुणे महानगरपालिकेच्या जकात नाक्यांवर जकात चोरीच्या घटनांनमध्ये वाढ झाली आहे.

close