वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 8 लाखांची नुकसान भरपाई

January 16, 2015 6:16 PM0 commentsViews:

delhi zoo tigar attack (5)16 जानेवारी : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास त्यांच्या वारसांना काही अटींच्या अधीन राहून पूर्वी पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले जात असे आता या अर्थसहाय्यात 3 लाख रुपयांची वाढ करण्यात आली असून ही वाढ 8 लाख रूपये इतकी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय दिनांक 16 जानेवारी, 2015 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

वाघ, बिबटया, अस्वल, गवा (बायसन), रान डुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, हत्ती, मगर, रानकुत्रे (ढोल) तसंच अन्य वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्यानंतर किंवा मनुष्य हानी झाल्यानंतर शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते. या नुकसान भरपाईच्या रक्कमेत वाढ करण्याची घोषणा वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार आता ही वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना पुर्वीच्या धोरणानुसार 7500 रुपयांची रक्कम अर्थसहाय्य म्हणून दिली जात असे. या रक्कमेतही दुप्पट वाढ करण्यात आली असून नव्या तरतुदीनुसार वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला औषधोपचारासाठी 15 हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाईल. महाराष्ट्रात दिली जाणारी नुकसानभरपाईची ही रक्कम देशात सर्वात अधिक आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close