भारतीय क्रिकेट टीम पुढच्या हंगामासाठी सज्ज

August 27, 2009 2:01 PM0 commentsViews: 4

27 ऑगस्टभारतीय क्रिकेट टीम पुढच्या हंगामासाठी सज्ज होत आहे. त्यासाठी बंगळुरूमध्ये 4 दिवसाच्या एका सराव शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. गेले दोन महिने भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळाली होती पण आता यापुढे त्यांचा कार्यक्रम भरगच्च असणार आहे त्यामुळे भारतीय टीमसाठी पुढचे सहा महिने नॉनस्टॉप क्रिकेटचे असणार आहेत. हंगामाची सुरूवात कॉर्पोरेट कपने होणार आहे. जिथे भारतीय टीममधले बहुतेक खेळाडू आपापल्या कंपनीसाठी खेळतील. त्यानंतर टीम श्रीलंकेसाठी रवाना होईल जिथे ट्राय सीरिज भारत खेळणार आहे. न्युझीलंडही त्यात सहभागी होणार आहे आणि मग सुरू होईल चॅम्पियन्स ट्रॉफी.

close