1998ची पोखरण अणुचाचणी अयशस्वी – के. संथानम

August 27, 2009 2:06 PM0 commentsViews: 44

27 ऑगस्टराष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचं सरकार सत्तेवर आल्यानंतर पोखरणमध्ये 1998 साली दुसरी अणुचाचणी घेण्यात आली होती. मात्र ही अणुचाचणी पूर्णपणे यशस्वी झाली नव्हती असा खळबळजनक खुलासा अणुशास्त्रज्ञ के. संथानम यांनी केला आहे. ही अणुचाचणी करणार्‍या पथकात संथानम यांचाही समावेश होता. संथानम हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडिओचे अधिकारीही आहेत. ही अणुचाचणी पूर्ण यशस्वी झाली नसल्यानंच सीटीबीटी करारावर सही न करण्याची भूमिका भारतानं घेतली होती.अणुसंशोधनात भारताला आणखीही काही चाचण्या कराव्या लागणार असल्याचा दावाही संथानम यांनी केला. मात्र एनडीच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या ब्रजेश मिश्रा यांनी ही अणुचाचणी यशस्वी झाली होती असा, दावा केला आहे.

close