पतीला मृत दाखवून पत्नीने लाटले पेन्शनचे पैसे !

January 16, 2015 11:13 PM0 commentsViews:

kolhapur416 जानेवारी :पेन्शन मिळवण्यासाठी एका महिलेनं आपल्या जिवंत नवर्‍याला मृत दाखवल्याचा गंभीर प्रकार उघड झालाय. या महिलेनं नवर्‍याचा मयत दाखला दाखवून पेन्शनचे पैसे लाटले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज शहरात हा खळबळजनक प्रकार घडलाय.

घडलेली हकीकत अशी की, संजय गांधी निराधार योजनेमुळे अनेक विधवा आणि असहाय महिलांना फायदा झाला. पण गडहिंग्लजमधल्या रेणुका जाधव हिनं जिवंत नवर्‍याचा मयत दाखला काढून पेन्शन मिळवलीय. रेणुकाचा विवाह सुनिल मारुती जाधव यांच्याशी झालाय. दोघांमध्ये कायम वाद व्हायचे. त्यातच सुनील कामानिमित्त कायम बाहेरगावी असायचे. त्याचाच गैरफायदा घेत रेणुकानं गडहिंग्लज नगरपालिकेतून पतीच्या निधनाचा दाखला मिळवला आणि पेन्शन लाटली. दरम्यान रेणुका हिला दाखला दिलाच कसा हाही मुद्दा महत्वाचा आहे. तिच्या पतीच्या निधनाची नोंदच नसताना दाखला देणार्‍यावरही कारवाई करावी अशी मागणी होऊ लागलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close