भाजपमधला अंतर्गत वाद आता संघाच्या दारी

August 28, 2009 6:41 AM0 commentsViews: 1

28 ऑगस्टगुरुवारी माजी केंद्रीय सचिव ब्रजेश मिश्रा यांनी कंदहारचा गौप्यस्फोट केला. भाजपमध्ये सुरु असलेल्या गडबडीच्या पार्श्वभूमीवर लालकृष्ण अडवाणी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेणार आहेत. गुरुवारी CNN-IBN च्या डेव्हिल्स ऍडव्होकेट या कार्यक्रमात कंदहार प्रकरणी अतिरेक्यांना सोडण्याचा निर्णय अडवाणींच्या उपस्थितीत घेण्यात आला होता असा रहस्यभेद ब्रजेश मिश्रा यांनी केला होता. गेल्या काही दिवसंापासून भाजपमध्ये सुरु असलेला अंतर्गत कलह आता कळसाला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपला नेत्यांच्या बंडाळीनं सतावलं आहे. वसंुधरा राजे यांचा राजीनामा देण्यास नकार, जसवंत सिंग यांची हकालपट्टी अरुण शौरी यांची पक्षावरची टीका आणि आता ब्रजेश यांचा खुलासा.या सगळ्या महाभारताच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

close