‘MSG’वरून वादंग, सेन्सॉर बोर्डाच्या 8 सदस्यांचं राजीनामास्त्र

January 17, 2015 2:25 PM0 commentsViews:

msg17 जानेवारी : ‘मेसेंजर ऑफ गॉड’ सिनेमावरून सेन्सॉर बोर्डाच्या राजीनामास्त्र उपसले आहे. आज आणखी आठ सदस्यांनी राजीनामा दिलाय. लीला सॅमसन यांनी शुक्रवारी बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी या 8 जणांनी राजीनामा दिलाय.

‘मेसेंजर ऑफ गॉड’ या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिल्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅम्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लीला सॅमसन यांनी ‘मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाला सेन्सॉरचं प्रमाणपत्र मिळालं, याच्याशी मी अजिबात सहमत नाही. यामुळे मी पदाचा राजीनामा दिलाय. सदस्यांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात नाही. कुणीही सदस्य बनू शकतं. एखाद्या पक्षाचे सदस्य असल्यामुळे त्यांची नेमणूक सेन्सॉर बोर्डाचे सदस्य म्हणून होते. मी मंत्रालयाला अनेक पत्र लिहिली. पण त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलं नाही अशी नाराजी त्यांनी उघड केली होती. सॅमसन यांच्या राजीनाम्याला काही 24 तास उलटत नाही तेच आज लीला सॅमसन यांच्या समर्थनात आणखी आठ सदस्यांनी राजीनामा दिलाय. माहिती, प्रसारण मंत्रालयाकडून होणारी ढवळाढवळ आणि बोर्डात सुरू असलेला भ्रष्टाचार, यामुळे या 8 सदस्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलंय. सरकारनं आमचं म्हणणं ऐकावं, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं सदस्य ईरा भास्कर यांनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close