हे कसलं ‘लव्हिंग इट’ ?, मॅक्डोनल्डस्‌मधून गरीब मुलाला हाकललं

January 17, 2015 3:24 PM1 commentViews:

pune mack17 जानेवारी : ‘आय ऍम लव्हिंग इट’ अशी जाहिरातबाजी करून ग्राहकांना भुरळ घालणार्‍या मॅक्डोनल्डस्‌चा खोटा चेहरा समोर आलाय. एका महिलेनं माणुसकी दाखवत एका रस्त्यावरच्या एका मुलाला फॅण्टा घेऊन देण्यासाठी मॅक्डोनल्डस्‌मध्ये सोबत घेऊन गेली. मात्र, मॅक्डोनल्डस्‌च्या कर्मचार्‍यांनी या मुलाला बाहेर हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय.

घडलेली हकीकत अशी की, शाहीन आत्तारवाला या कामानिमित्ताने 10 जानेवारीच्या दरम्यान पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी आपल्या काही मित्रमंडळींसोबत त्या जंगली महाराज रोड इथल्या मॅक्डोनल्डस्‌मध्ये गेल्या. इथेच रस्त्यावर असणार्‍या काही भिकारी मुलांनी त्यांच्याकडे ते पीत असेलेलं कोकाकोला देण्याची मागणी केली.

त्यावेळी शाहीन यांनी या मुलांना नवीन फॅण्टा फ्लोट खरेदी करुन देण्याची तयारी दाखवली. यातल्या एका मुलाकडे पैसे देऊन त्यांनी आपल्यासोबत त्याला मॅकडोनल्ड्स मध्ये नेलं. आणि खरेदी करण्यासाठी रांगेत उभं केलं. यावेळी इथल्या कर्मचार्‍यांनी अशा मुलांना मॅकडोनल्ड्समध्ये येण्याची परवानगी नाही असं म्हणत त्याला हाकलून दिलं असा दावा शाहीन यांनी केला आहे.

यापुर्वी देखिल या मॅक्डोनल्डस्‌मध्ये अशा घटना घडल्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पैसे असताना खरेदी करण्यासाठी हा मुलगा आला असेल तर भेदभाव कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

शाहीन आत्तारवाला यांनी फेसबुकच्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फोडल्यामुळे ही बाब समोर आली आहे. या प्रकारावर मॅक्डोनल्डस्‌ने सारवासारव केली.”आम्ही या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करतोय. आम्ही सर्वांचा सन्मान करतो आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला आमचा पाठिंबा नाही. आमचे कर्मचारी दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य कारवाई करू”असं खुलासा केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • bharat karale

    he tar CCD madhe dekhil hot … mi pahilel aahe ..

close