बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजाची जमिनी पालिकेनं हडपली?

January 17, 2015 3:17 PM0 commentsViews:

bajiprabhu_land417 जानेवारी : पावनखिंडीत शत्रूंना रोखून धरणार्‍या बाजीप्रभू देशपांडे यांचा इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. मात्र या शूरवीर बाजीप्रभूंच्या वंशजाना मिळालेल्या जमिनीवर बदलापूर पालिकेनं अनधिकृत स्मशान उभारले आहे. आपल्या हक्काची जमीन परत मिळावी यासाठी देशपांडे यांची कन्या प्रिय राजे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

बाजीप्रभूंचे वंशज रामचंद्र देशपांडे हे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांना 1974 मध्ये बदलापूरमधील शिरगांव येथील दोन हेक्टर जमीन देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर 1992 पर्यंत मालकी हक्क हा देशपांडे यांच्याकडे होता. त्यानंतर ही जमीन वनजमीन म्हणून आरक्षित करण्यात आली मात्र या जमिनीवर आता बदलापूर पालिकेने अनधिकृत स्मशान बांधले आहे. आता ही जमीन परत मिळावी म्हणून रामचंद्र देशपांडे यांची कन्या प्रिय राजे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत कुणीही बोलायला तयार नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close