रक्षकालाच मारहाण, तरीही ढिम्म लोकं व्हिडिओ रेकॉर्ड करत होते !

January 17, 2015 5:07 PM0 commentsViews:

local_marhan17 जानेवारी : सार्वजनिक ठिकाणी असंवेदनशीलता किती वाढत चाललीय याचा प्रत्यय लोकल ट्रेनमध्ये तैनात असणार्‍या एका होमगार्डला आला. सीएसटी टिटवाला लोकल ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास लेडीज डब्यात चढण्यास मनाई करणार्‍या होमगार्डलाच तीन मद्यपी प्रवाशांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या घटने दरम्यान तेथे असलेल्या अन्य मोबाईल फेम प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ काढला मात्र कुणीही या होमगार्ड च्या मदतीला आले नसल्याची खंत होमगार्डने व्यक्त केली.

गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास सीएसटीहून टिटवाळ्याच्या दिशेने येणारी लोकलमध्ये घाटकोपर स्थानकात तीन मद्यपी महिलांच्या फर्स्ट क्लासमध्ये चढले. या डब्यात चढण्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या होमगार्ड समीर शेख याने त्यांना विरोध करत त्यांना खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, या मद्यपी तरुणांनी होमगार्डलाच मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी समीर शेख यांनी कल्याण जी.आर.पी.मध्ये तक्रार नोंदवली आहे. याबाबत पोलीस या मद्यपींचा शोध घेत आहेत. याबबत होमगार्ड समीरने मला मारहाण होत असताना उपस्थित प्रवाशांनी माझी मदत करण्याऐवजी या घटनेचे व्हिडिओ काढण्यात मग्न झाल्याचे सांगत जणू माणुसकी हरवल्याची खंत व्यक्त केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close