राज्यात ठिकठिकाणी छापे टाकून डाळींचे साठे जप्त

August 28, 2009 6:46 AM0 commentsViews: 2

28 ऑगस्टराज्यात ठिकठिकाणी छापे टाकून डाळींचे साठे जप्त करण्यात आले आहेत. वाशीममध्ये राज्य वखार महामंडळाच्या गोदामावर छापा टाकण्यात आला.या छाप्यामध्ये 16 हजार 592 क्विंटल म्हणजे 3 कोटी 93 लाखाचा डाळ साठा जप्त करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी ही कारवाई केली. बुधवारच्या छाप्यामध्ये 25 धान्य व्यापार्‍यांवर कारवाई करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखलीमध्येही 36 हजार 508 क्विंटल धान्य एका खासगी गोदामातून जप्त करण्यात आलं. त्याची किंमत 9 कोटी इतकी आहे.

close