मुंबई पोलीस दलात नवीन शस्त्रसाठा दाखल

August 28, 2009 6:49 AM0 commentsViews: 2

28 ऑगस्ट 26/11 सारख्या हल्ल्याला तोंड द्यायला पोलीस दल सज्ज असावं, यासाठी आता प्रयत्न सुरू झालेत. याचाच एक भाग म्हणून पोलीस दलात नवीन शस्त्रसाठा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी अत्याधुनिक वाहनांचा ताफा मुंबईच्या पोलिसांना देण्यात आला होता. अशा अत्याधुनिक शस्त्र आणि साधनांचा वापर करून हल्ल्याला लवकरात लवकर प्रत्युत्तर देण्यासाठी क्विक रिस्पॉन्स टीमही तयार करण्यात आली आहे. या टीम मध्ये 450 जवानांचा समावेश करण्यात आला आहे. हे जवान नव्वद जणांच्या टीमने मुंबईतल्या वेगवेगळ्या पाच रिजनमध्ये ठेवण्यात येणार आहेत.

close