धुळ्यात बँकेवर दरोडा, 96 लाखांची रोकड लुटली

January 17, 2015 6:56 PM0 commentsViews:

dhule_bank robbery17 जानेवारी : धुळे शहरात चोरट्यांनी बँक ऑफ बडोदावर दरोडा टाकून 96 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडलीये. शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी ही लूट करत राज्याच्या गृह राज्यमंत्री यांचे जिल्हा दौर्‍यावर स्वागत केल्याची चर्चा रंगलीये.

शहरातील बँक ऑफ बडोदावर चोरट्यांनी मोठ्या शितफिने दरोडा टाकला. चोरट्यांनी सुरुवातीला बँकेचे दरवाजेचे लॉक तोडले नंतर पुन्हा दरवाजे पूर्ववत बंद केले. बँकेत गेल्यावर आधी सायरनच्या आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या वायरी तोडल्या. अवघ्या वीस मिनिटांत चोरट्यांनी या घटनेला अंजाम दिला. विशेष म्हणजे विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून शनिवारी राज्याचे गृह राज्य मंत्री राम शिंदे एका पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाला धुळ्यात येणार आहेत. चोरट्यांनी बँकेवर दरोडा टाकून गृहराज्य मंत्री आणि पोलीस महानिरीक्षकांना अनोखी सलामी दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close