राजमाता जिजाऊंच्या वाड्याची दुरवस्था, प्रशासनाचं दुर्लक्ष

January 17, 2015 8:58 PM0 commentsViews:

17 जानेवारी : रायगडजवळच्या पाचडमध्ये राजमाता जिजाऊ यांनी अखेरचा श्वास घेतला. इथे त्यांची समाधीही आहे. या वाड्याची मात्र भयानक दुरवस्था झालीये आणि पुरातत्व खात्याचं इकडं पूर्णपणे दुर्लक्ष होतंय.

रायगडजवळच्या पाचाडमधला हा राजमाता जिजाऊंचा वाडा…याच वाड्यात जिजाऊ मासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक शिवप्रेमी इथं आवर्जून येतात, पण त्यांची निराशा होतेय. कारण आता या वाड्यात दिसतंय हे असं वाढलेलं गवत…घाणीचं साम्राज्य…शिवप्रेमींना चालायला साधी पायवाटही नाहीये.

एकेकाळी शिवरायांचं आदरस्थान असलेल्या या वाड्यात आणि परिसरात दिसतं फक्त घाणीचं साम्राज्य..गुरंढोरांची जा-ये आणि वाड्याचे ढासळलेले दगड…खरं तर हा सगळा परिसर स्वच्छ करून तिथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याचा शिवप्रेमींचा मानस होता,पण त्याला परवानगी मिळाली नाही.

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त पाचाडला आलेल्या शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीआता प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्‍वासन ग्रामस्थांना दिलंय.

अशा समृद्ध ऐतिहासिक वारसा सांगणार्‍या वास्तू सांभाळाव्यात ही जबाबदारी आहे असं सरकारला कधी वाटणार हाच खरंतर प्रश्न आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close