नक्षली घेतायत हेलिकॉप्टर पाडण्याचं प्रशिक्षण

January 17, 2015 9:59 PM0 commentsViews:

naxal_training17 जानेवारी : नक्षली कारवायांनी सुरक्षा यंत्रणेला आव्हान देणार्‍या नक्षलवाद्यांनी आता आणखी एक धक्का दिलाय. नक्षलग्रस्त भागांमध्ये सध्या हेलिकॉप्टर पाडण्याचं प्रशिक्षण दिलं जातं असल्याची धक्कायक माहिती समोर आलीये. या प्रशिक्षणाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आयबीएन लोकमतच्या हाती लागलाय.

या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरचा एक डमी बनवण्यात आलाय. आणि या डमी हेलिकॉप्टरला लाईट मशीन गननं पाडण्याचं प्रशिक्षण माओवाद्यांना दिलं जातंय. आंध्र प्रदेश आणि ओरिसाच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण बस्तरमध्ये हे जास्त दिसून येतंय.

याचं कारण म्हणजे नक्षलवादी विरोधी कारवायांमध्ये सुरक्षा बळांसाठी हेलिकॉप्टर खूपच उपयोगी ठरतंय. जखमी जवानांना वाचवण, अतिरिक्त कुमक पाठवणं, यात हेलिकॉप्टरची प्रचंड मदत होते. या बाबीनं चिडून माओवादी सध्या हे प्रशिक्षण देत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close