वाढलेल्या महागाईवर शिवसैनिकांचा हल्लाबोल

August 28, 2009 8:56 AM0 commentsViews: 1

28 ऑगस्टवीज दरवाढीविरोधातील आंदोलनानंतर आता शिवसेना जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींविरोधात रस्त्यावर उतरली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत धान्यांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.सरकारने घोषणा केलेली स्वस्त दरातली तुरडाळ अजूनही रेशनिंग दुकानांवर पोचलेली नाही, याविरोधात सेनेनं मुंबईत टाळं बंद आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईत ठिकठिकाणी रेशनिंग ऑफिसेसवर हे आंदोलन सुरू आहे. आज सकाळी 10.30च्या सुमारास घाटकोपरमध्ये शिवसैनिकांनी रेशनिंग ऑफिसवर आंदोलन केलं आणि ते बंद करण्याचा प्रयत्न केला. सणासुदीच्या दिवसांमध्ये जीवनावश्यक वस्तू महागल्याने लोकांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष सरकारपर्यंत पोचवण्यासाठी मुलुंड, भांडुप, कुर्ला, कांदिवली, मालाड, दहिसर, बोरीवली अशा अनेक ठिकाणी शिवसेनेतर्फे टाळं बंद आंदोलन केलं जाणार आहे.

close